आझम खान यांना न्यायालयाचा मोठा दणका! पत्नी आणि मुलासह तुरुंगात

SP leader Azam Khan surrenders with wife and son sent to jail
SP leader Azam Khan surrenders with wife and son sent to jail

रामपूर : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना रामपूर न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. आझम खान, त्यांची पत्नी तजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला या तिघांनाही न्यायालयाच्या आदेशानुसार तुरूंगात पाठवण्यात आले आहे. या तिघांनाही 2 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे.

आझम खान यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलासहं बुधवारी आत्मसमर्पण केलं होतं. आझम खान यांनी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांची ही याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आझम खान यांनी आतापर्यंत 20 प्रकरणांकरता न्यायालयामध्ये जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. यापैकी काही प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र मुलगा अब्दुल खानचं बनावट डिग्री आणि बनावट पासपोर्टचं प्रकरण त्यांच्या अंगलट आलं आहे.

इंदूरीकरांच्या किर्तनाला गेल्या अन्...

दोन खोट्या डिग्र्या असण्याच्या आरोपाखाली आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला खान विरोधात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी अनेकदा आझम खान यांच्याकडून न्यायालयाने सुनावणीसाठी दिलेली तारीख चुकवण्यात आली होती. वेळोवेळी गैरहजर राहिल्यामुळे आझम खान आणि त्यांच्या पत्नी-मुलाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आज तिघांनी न्यायालयात हजर होत जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र अनेक वेळा न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे कलम 420 अंतर्गत त्यांचा जामीनअर्ज फेटाळण्यात आला आहे. जामीनासाठी त्यांना आता उच्च न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com