
वर्षातील पहिलं सूर्यग्रहण शनिवारी : जाणून घ्या वैशिष्ट्ये
मुंबई : यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिलला देशाच्या विविध भागांतून दिसणार आहे. सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी आणि सूर्याच्या मधे चंद्र येतो. चंद्रा सूर्याला झाकत असल्यामुळे त्याचा काही भागच पृथ्वीवरून दिसतो. यामुळे पृथ्वी काही काळासाठी झाकोळली जाते. नासाच्या नोंदीनुसार यासारखी आणखी एक घटना घडते ज्यास black moon असे म्हणतात. यामुळे दिवसाढवळ्या सूर्यप्रकाश कमी होतो.
कधी दिसणार सूर्यग्रहण ?
यावर्षीचे खग्रास सूर्यग्रहण १ मे या दिवशी मध्यरात्री १२.१५ मिनिटांनी दिसणार आहे. भारताच्या बाहेर राहणाऱ्यांना हे ग्रहण पौर्वात्य वेळेनुसार दुपारी २.४५ वाजता दिसेल. दुपारी ४.४१ वाजता संपूर्ण ग्रहण दिसेल. ६.३७ वाजता हे ग्रहण संपेल.
खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय ?
खग्रास सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही. त्यामुळे सूर्याला चंद्रकोरीचा आकार प्राप्त होतो. चंद्र पृथ्वीवरील सावलीचा फक्त बाह्य भाग प्रतिबिंबित करतो ज्याला penumbra असे म्हणतात.