esakal | श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान हुतात्मा; 3 जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

2 cops killed as terrorists fire at police team on outskirts of srinagar

जम्मू-काश्मीरमधील नवगाम येथे दहशतवाद्यांनी आज (शुक्रवार) सकाळी केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले असून, तीन जवान जखमी झाले आहेत.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान हुतात्मा; 3 जखमी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील नवगाम येथे दहशतवाद्यांनी आज (शुक्रवार) सकाळी केलेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले असून, तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी हल्ला झालेला परिसर लष्कराने ताब्यात घेतला असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

Video: कोरोना योद्ध्यांना कडक सॅल्यूट!

काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवगाम बाह्यवळणाजवळ नाकाबंदी सुरू होती. यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंदपणे गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या गोळीबारात इश्फाक अहमद आणि फैज अहमद हे हुतात्मा झाले. दोघेही जम्मू-काश्मीर पोलिसांच्या आयआरपी बटालियन -20 मध्ये तैनात होते. तिघे जण जखमी झाले आहेत. लष्कराने परिसर ताब्यात घेतला असून, दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. देशात उद्या 74 व्या स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. त्याआधी झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

खतरनाक विमान लँडींगचे व्हिडिओ व्हायरल...