medical worker sweat pouring ppe after working hours video viral
medical worker sweat pouring ppe after working hours video viral

Video: कोरोना योद्ध्यांना कडक सॅल्यूट!

बीजिंग (चीन): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांना पीपीई किटचा वापर करावा लागतो. पण, पीपीई किट घातल्यानंतर शरीरामध्ये घामाच्या धारा लागतात. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, कोरोना योद्ध्यांना नेटिझन्स कडक सॅल्यूट करत आहेत.

कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करण्यासाठी विविध क्षेत्रातील नागरिक अहोरात्र काम करत आहे. वैद्यकिय कर्मचारी आणि डॉक्टर्स आपल्या जीवाची पर्वा न करता गेल्या काही महिन्यांपासून काम करत आहेत. शिवाय, कुटुंबापासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना पीपीई किट देण्यात आले आहे. मात्र, पीपीई किट घालून कित्येक तास काम करावे लागत आहे. एका कोरोना योद्ध्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोरोना किट काढताना नर्स आणि डॉक्टरांची अवस्था नेमकी कशी असते हे पाहायला मिळते. पीपीई किट घातल्यानंतर शरिरामध्ये अक्षरश: घामाच्या धारा येत असतात. शिफ्ट संपल्यावर डॉक्टर पीपीई कीट काढतात तेव्हा घामामुळे त्यांची अवस्था नेमकी कशी होते, हे पाहायला मिळते. पीपीई कीट काढल्यानंतर घामाचे साचलेले पाणी बाहेर पडताना दिसते.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, 'संबंधित व्हिडिओ चीनमधील कोविड -19 रुग्णालयातील आहे. शिफ्ट संपल्यानंतर, एक डॉक्टर पीपीई कीट काढतो तेव्हा घामाच्या धारा वाहू लागतात. कोरोनाच्या संकटात लढणाऱ्या या खऱ्या हिरोंना सलाम.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com