काश्मीर - सुरक्षा दलाला मोठं यश; हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jammu

जम्मू आणि काश्मीरमध्ये आणखी एका हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलं आहे.

काश्मीर - सुरक्षा दलाला मोठं यश; हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कुलगाम - जम्मू आणि काश्मीरमध्ये आणखी एका हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलं आहे. काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चावलागाम परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. शुक्रवारी या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आल्याची माहिती विभागीय पोलिसांनी दिली.

चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. एकूण ठार कऱण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या दोन इतकी झाली आहे. अद्याप परिसरात दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचे पथक परिसरात शोध घेत आहे. तसंच मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे शिराझ मोलवी आणि यावर भट असून ते हिजबुल मुजाहिद्दीनचे जिल्हा कमांडर असल्याचं समजते. शिराज हा २०१६ पासून सक्रीय होता. अनेक घातपाताच्या कारवाया आणि नागरिकांच्या हत्येत त्याचा सहभाग होता. शिराजला कंठस्नान घातलं हे सुरक्षा दलाचं मोठँ यश असल्याचं काश्मिरचे पोलिस महानिरिक्षक विजय कुमार यांनी म्हटलं.

गुरुवारपासून सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली होती. चावलागाम परिसरात दहशतवादी लपल्याचे समजल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरक्षा दल कारवाई करत आहे.

loading image
go to top