esakal | लष्कराच्या कारवाईला मोठं यश! श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

Army_1_24.jpg

जम्मू-काश्मीरच्या रणबीरगडमध्ये भारतीय जवानांच्या कारवाईला मोठे यश आलं आहे. भारतीय जवानांनी चकमकीत दोन दहशतवद्यांचा खात्मा केला आहे.

लष्कराच्या कारवाईला मोठं यश! श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या रणबीरगडमध्ये भारतीय जवानांच्या कारवाईला मोठे यश आलं आहे. भारतीय जवानांनी चकमकीत दोन दहशतवद्यांचा खात्मा केला आहे. यात लष्कर ए तोयबाचा कमांडर इश्फाक रशीद खान आणि एजाज यांचा समावेश आहे. यासंदर्भातले वृत्त एएनआयने दिले आहे. 

रणबीरगड येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराची २९ राष्ट्रीय रायफलसची तुकडी आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्रितपणे दहशतवादी ज्या जागी लपले होते, त्या परिसराला वेढा दिला. याची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधूंद गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्यानेही गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

संकटातून नफा कमावत आहे गरीब विरोधी सरकार; राहुल गांधींचा बोचरा वार
चकमकीत भारताचा एक जवानही जखमी झाला आहे. त्याला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या या कारवाईत लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर मारला गेल्याने हे मोठे यश मानलं जात आहे. लष्कराने दहशतवाद्यांकडून एक एके-४७ रायफल आणि पिस्तूल हस्तगत केले आहे. शिवाय भारतीय जवानांनी परिसरात शोध मोहिम सुरु ठेवली आहे.  

loading image