'यूपी'त अपघातानंतर बसला भीषण आग; 20 जण ठार 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांनी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

लखनौ : उत्तर प्रदेशमधील कनौज जिल्ह्यात मालमोटार आणि खासगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातात 20 प्रवासी ठार झाले आहेत. बसमधील 21 प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांनी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जयपूरकडे जाणारी खासगी बस आणि मालमोटारीची आज सायंकाळी धडक झाली. यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. अग्निशमन दलाच्या तीन चे चार बंबांनी सुमारे 30 ते 40 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. या बसमध्ये सुमारे 45 प्रवासी होते. या बसमधील 10 ते 12 प्रवासी अपघातानंतर लगेचच बाहेर पडले. बसमधील एकूण 21 प्रवासी बचावले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे. आगीत बसचे मोठे नुकसान झाल्याने बसमधील इतर प्रवासी बचावले असण्याची शक्‍यता कमी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 dead after a bus catches fire in a a head-on collision with a truck in Uttar Pradesh Kannauj