'कॉंग्रेस'मधील राजीनामासत्र थांबेना! आणखी २० नेत्यांनी सोडला पक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

20 more congress leaders jammu kashmir congress resign in support of ghulam nabi azad

'कॉंग्रेस'मधील राजीनामासत्र थांबेना! आणखी २० नेत्यांनी सोडला पक्ष

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यानंतर काँग्रेस पक्षाला लागलेली गळीती थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. पक्षातून राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील आणखी 20 काँग्रेस नेत्यांनी आझाद यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

गुलाम नबी आझाद यांनी ऑगस्टमध्ये काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी काँग्रेस नेतृत्व आणि राहुल गांधींवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आझाद यांचा राजीनामा हा अलीकडच्या काळात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या आधी हिमाचल प्रदेशात, जिथे निवडणुका होणार आहेत, आनंद शर्मा यांनीही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजीनामा देणारे सर्व 20 सदस्य जम्मू उत्तर विभागाच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. या सर्वांनी पक्षाचे नेते राजिंदर प्रसाद यांच्यासह राजीनामे दिले. प्रसाद हा नौशेरा राजौरी येथील मास्टर बेली राम शर्मा यांचे पुत्र आहेत. आझाद यांच्याप्रमाणेच त्यांनीही पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनामा पत्र लिहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षातील मंडळ व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे .प्रसाद यांनी लिहिले आहे की, आज पक्ष पूर्णपणे पॅराशूटच्या मदतीने येथे पोहोचणाऱ्यांनी घेरला आहे. त्यामुळे पक्ष सामान्य जनतेच्या वेदना आणि अडचणींपासून दूर होत आहे ज्यामुळे अडचणी वाढत आहेत.

हेही वाचा: 'आदित्य साहेब तुम आगे बढो!', चिमुरड्याची घोषणाबाजी; पाहा Viral Video

यापूर्वी गुरुवारी काँग्रेसच्या 36 नेत्यांनीही आझाद यांना पाठिंबा दर्शवत पक्षाचा राजीनामा दिला होता. यामध्ये नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्षही सहभागी झाले होते. दुसरीकडे, पक्षाच्या 64 ज्येष्ठ नेत्यांनी आधीच काँग्रेस सोडली आहे. आझाद यांच्या पाठिंब्याच्या राजीनाम्यांची ही दीर्घ मालिका असल्याचे मानले जात आहे. महत्वाचे म्हणजे गुलाम नबी आझाद यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यांनी राहुल गांधींवर काँग्रेसची अंतर्गत व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत त्यांना अपरिपक्व म्हटले होते.

आझाद यांनी सोनिया गांधींना दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांचे वर्णन नाममात्र अध्यक्ष असे केले होते. पक्षाचे बहुतांश निर्णय राहुल गांधी यांचे सुरक्षा रक्षक आणि पीए घेतात असा आरोपही केला होता. गुलाम नबी आझाद नवीन राष्ट्रीय पक्ष काढण्याच्या तयारीत असून आझाद यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडलेले सर्व नेते येत्या काही दिवसांत आझाद यांनी सुरू केलेल्या नव्या पक्षात सामील होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: 'हा खोडसाळपणा फारच हास्यास्पद'; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याबाबत शेलारांचे ट्विट

Web Title: 20 More Congress Leaders Jammu Kashmir Congress Resign In Support Of Ghulam Nabi Azad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jammu And KashmirCongress