esakal | कोविशील्ड-कोवॅक्सिन लसीचं कॉकटेल; UP मधील गावात खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Covishield Covaxin

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे २० जणांना कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसी देण्यात आल्या, ही गोष्ट सीएमओ संदीप चौधरी यांनी मान्य केली आहे.

कोविशील्ड-कोवॅक्सिन लसीचं कॉकटेल; UP मधील गावात खळबळ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ज्या लोकांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला होता, त्यांना दुसरा डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला आहे. वॅक्सिनचं कॉकटेल झाल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत एकाही व्यक्तीकडून तब्येतीत बिघाड झाल्याची तक्रार आलेली नाही. (20 peoples get Covaxin as second dose after Covishield in UP)

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

बढ़नी या जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. तेथील जवळपासच्या दोन गावातील २० जणांना कोविशील्डचा पहिला डोस देण्यात आला होता. १४ मे रोजी दुसरा डोस घेण्यासाठी हे सर्वजण आले होते. त्यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला. या घटनेची माहिती कळताच तेथील आरोग्य विभागात जोरदार खळबळ उडाली. सर्वजण एकमेकांवर आरोप करू लागले. जेव्हा ही गोष्ट लस घेतलेल्या नागरिकांना समजली, तेव्हा त्यांनाही घाम फुटला होता. कॉकटेल वॅक्सिन घेतल्यानंतरही एकाही व्यक्तीला आरोग्याच्या तक्रारी जाणवल्या नाहीत, पण सर्वजण घाबरलेले आहेत.

हेही वाचा: झारखंड आणि छत्तीसगड लस वाया घालवण्यात 'एक नंबर'!

अधिकारी म्हणाले...

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे २० जणांना कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसी देण्यात आल्या, ही गोष्ट सीएमओ संदीप चौधरी यांनी मान्य केली आहे. या सर्व नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत एकाही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. पण निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अहवाल सादर होताच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे चौधरी यांनी सांगितले.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.