
Same Voter ID Issue: भारतीय निवडणूक आयोगाच्या डेटामध्ये समान EPIC क्रमांक अर्थात वोटर आयडी क्रमांक तयार झाल्यानं या दोन्हीही क्रमांकाच्या मतदातरांना मतदान करताना अडचणी येत होत्या. अनेकदा त्यांचं मतदान बाद केलं जात होतं. डेटाबेसमध्ये झालेल्या चुकीच्या पद्धतीच्या नोंदणीमुळं ही समस्या निर्माण झाली होती, तब्बल वीस वर्षांपासून असलेल्या या समस्येवर अखेत तोडगा काढण्यात आला आहे. निवडणूक आयोगानं ही मोठी कामगिरी केली आहे.