Coronavirus : इराणमधून 200 जण येणार भारतात!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 मार्च 2020

- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. खबरदारी म्हणून अनेक देशांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. असे असताना इराणमधील 200 भारतीय नागरिकांना आता मुंबईत आणण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे १४ रुग्ण; कर्नाटकात देशातील पहिला बळी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक विमानतळांवर विशेष तपासणी केली जात आहे. तसेच इतर देशातील नागरिकांना भारतात येण्यास काही प्रमाणात बंदी घातली जात आहे. त्यानंतर आता मूळचे भारतीय असलेल्या इराणमधील 200 नागरिकांना भारतात आणले जाणार आहे. मुंबई विमानतळावर हे सर्व लोक येणार आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास हे विमान मुंबईत उतरले, अशी शक्यता आहे. 

Coronavirus esakal

याशिवाय 15 मार्चला दुसऱ्या टप्प्यात इराणहून विमान दिल्लीमध्ये येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 16 आणि 17 मार्चला विमान दाखल होणार आहे.

229 जणांची टेस्ट निगेटिव्ह

इराणमध्ये अडकलेल्या 529 भारतीयांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. मात्र, 529 नमुन्यांपैकी 229 टेस्ट निगेटिव्ह आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 Peoples coming from Iran in Mumbai on Coronavirus Issue