
मालेगाव बॉम्ब ब्लास्टमधील साक्षीदाराने आपली साक्ष फिरवत, आरोपी कर्नल पुरोहीतला ओळखण्यास नकार दिलाय. आपण मुंबई एटीएस ( आंतकवादविरोधी पथक) ला कसलाही जबाब दिला नसल्याचं साक्षीदाराने म्हंटलय. आतापर्यंत वीस साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली आहे. सलग वीस साक्षीदारांनी साक्ष फिरवल्याने एटीएस चे अधिकारी किंवा वकिल NIA या विशेष न्यायालयात उपस्थित असायला हवं असं म्हंटंल जातय.
मात्र महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनित अगरवाल यांनी "NIA (National investigation agency) कडे तपास असल्याने एटीएस उपस्थित राहू शकत नाही. जर त्यांनी काही मदत मागितली तरच आम्ही मदत करु असं म्हंयलय.' एका वृत्तवाहीनीशी ते बोलत होते. अनेक प्रकरणात साक्षीदार साक्ष फिरवत असतात. त्यामुळे ही केस कमकुवत होतेय असं म्हणता येणार नाही. असंही ते म्हणालेत.
२९ सप्टेंबर २००८ मध्ये हा बॉम्बब्लास्ट झाला होता. यात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० जण जखमी झाले होते.या प्रकरणात २२० जणांची साक्ष घेण्यात आली होती.
या प्रकरणात कर्नल पुरोहीतसह, भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय रहिरकर, सुधाकर द्विवेदी ,समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आरोपी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.