रतन टाटा पुन्हा चिडले, फोटो शेअर करीत व्यक्त केला राग

वृत्तसंस्था
Monday, 4 May 2020

सध्या सोशल मीडियावर एका रतना टाटा यांच्या नावाने फिरणाऱ्या फेक मेसेजवरून उद्योगपती रतन टाटा चांगलेच चिडले आहेत.

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एका रतना टाटा यांच्या नावाने फिरणाऱ्या फेक मेसेजवरून उद्योगपती रतन टाटा चांगलेच चिडले आहेत. रतन टाटा यांच्या फोटोसह एक संदेश व्हायरल होत आहे. यामध्ये लिहिले आहे की, २०२० हे जिवंत राहण्याचं वर्ष आहे. यावर्षात लाभ व हानीचा फार विचार करू नये. स्वप्न आणि योजनांबद्दल चर्चा करू नये. या वर्षी स्वत:ला जिवंत ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जीवित राहणं हे लाभाप्रमाणे आहे. यावर रतन टाटा यांनी राग व्यक्त केला. त्यांनी हा संदेश ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रतना टाटा म्हणाले की, 'हे मी लिहिलेलं नाही. जितक्यांदा शक्य होईल तितक्या वेळा मी ही फेक न्यूज असल्याचे सांगेन. मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही न्यूज स्त्रोत तपासून घ्या. कोणताही कोट माझ्या फोटोपुढे लावला म्हणजे ते मी म्हटंल आहे असं सिद्ध होत नाही. यापूर्वीही त्यांना अशाच फेक फोटोचा सामना करावा लागला होता. त्यावेळीही त्यांनी लोकांना मॅसेजचा स्त्रोत तपासून घेण्याचं आवाहन केलं होतं. अशाप्रकारे मोठ्या व्यक्तींच्या नावावर चुकीचा संदेश पसरवला जात असल्याच्या घटना वाढल्या असल्याचेही ते म्हणाले.

४ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह, पत्नीशी व्हॉट्सअ‍ॅपवर झालं अखेरचं बोलणं झालं अन्...

दरम्यान, सोशल मीडियाच्या युगात कोणताही संदेश व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. मात्र, नेहमीच त्याची विश्वासार्हता असतेच असं नाही. रतन टाटा यांना पुन्हा एकदा या फेक मेसेजमुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2020 is the year to survive not make profits WhatsApp forward is fake news Ratan Tata clarifies

Tags
टॉपिकस
Topic Tags: