esakal | ४ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह, पत्नीशी व्हॉट्सअ‍ॅपवर झालं अखेरचं बोलणं झालं अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Major

जम्मू काश्मीरच्या हंदवाडा परिसरात रविवारी (3 मे) रोजी भारतीय सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत शहीद झालेले मेजर अनुज सूद यांचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्यांची शहीद झाल्याची बातमी कुटुंबाला कळताच, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

४ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह, पत्नीशी व्हॉट्सअ‍ॅपवर झालं अखेरचं बोलणं झालं अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या हंदवाडा परिसरात रविवारी (3 मे) रोजी भारतीय सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत शहीद झालेले मेजर अनुज सूद यांचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्यांची शहीद झाल्याची बातमी कुटुंबाला कळताच, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हंदवाडा परिसरात झालेल्या चकमकीत मेजर, कर्नल, पोलिस अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्या जवानांमध्ये 21 राष्ट्रीय राइफल्स यूनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, दिनेश शर्मा, जम्मू-काश्मीरचे पोलीस निरीक्षक शकील काझी यांचा समावेश आहे. मेजर अनुज सूद यांचे वडील निवृत्त ब्रिगेडियर चंद्रकांत सूद यांनी सांगितले की, मेजरनं सर्वोच्च बलिदान दिलं आहे. त्यानं आपलं कर्तव्य योग्य बजावलं आहे. मला त्याच्या पत्नीबद्दल वाईट वाटत आहे, कारण ३-४ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचा बोरिस जॉन्सन यांच्याकडून सन्मान; केले असे काही... 

ब्रिगेडिअर (सेवानिवृत्त) सीके सूद यांनी सांगितले की, "मला देशाच्या या मुलाचा अभिमान आहे. संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे. तो तीन दिवस म्हणजे 1 मेपासून ऑपरेशनवर होता. आमचे शेवटचे संभाषण व्हॉट्सअ‍ॅपवर झाले होते. तीन दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो. तो नेहमीच धाडसी होता आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सर्वात पुढे होता. त्याच्याबरोबर शहीद झालेले सर्व जवान खूप शूर होते. अशा शूर सैनिकांना भारतरत्न नाही पण किमान त्यांना अशोक चक्र मिळायला हवे. जेव्हा आपण कोरोना योद्धांविषयी बोलत आहोत, तेव्हा असे खरे योद्धा आपल्या छातीत बुलेट घेत आहेत".