2024 Budget : 'बजेट'च्या दिवशीच सर्वसामान्यांना झटका, गॅसचे दर वाढले

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. आज (गुरुवार) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नेमक्या आजच्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका बसला आहे. गॅसच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
2024 Budget
2024 Budgetesakal

LPG Price Hike : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. आज (गुरुवार) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नेमक्या आजच्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका बसला आहे. गॅसच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही तास अगोदर एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसचे दर निश्चित करत असतात. कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंदरचे दर वाढवले आहेत. १९ किलोच्या सिलिंडरचे दर वाढलेले आहेत. घरगुती वापराच्या गॅसच्या दरांमध्ये वाढ झालेली नाही.

कुठे किती वाढ?

  • राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर १४ रुपये वाढले असून १७६९.५० रुपये प्रति सिलिंडर असा नवीन दर असेल.

  • कोलकाता येथे सिलिंडरची किंमत १८ रुपयांनी वाढून १८८७ रुपये झाली आहेत.

  • मुंबईत एलपीजी सिलिंडरचे दर १५ रुपयांनी वाढून १७२३.५० रुपये इतके झाले आहेत.

  • चेन्नईमध्ये १९ किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलिंडरचे दर १२.५० रुपयांनी वाढून १९३७ रुपये झाले आहेत.

2024 Budget
शिक्षक भरती आचारसंहितेत अडकणार? मराठा आरक्षणाचा तिढा; ‘पवित्र’वरील प्राधान्यक्रम भरण्याची सुरवात लांबणीवर

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज (गुरुवार) सादर होणार आहे. हे वर्ष निवडणुकीचे असल्याने सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार नाही. पण, निवडणुकीच्या वर्षांत सरकार मोठ्या घोषणा करू शकते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. देशभरात अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प अत्यंत विशेष मानला जात आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com