esakal | राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी चांदीची २२ किलोची वीट
sakal

बोलून बातमी शोधा

22 kg silver brick for Bhumi Pujan

राम मंदिराच्या भूमिपूजनाची जय्यत तयारी अयोध्येत सुरू आहे.यासाठी २२.६ किलो वजनाची शुद्ध चांदीची पहिली वीट तयार झाली आहे.स्वच्छता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.घाटांचे सुशोभीकरणही करण्यात  येत आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी चांदीची २२ किलोची वीट

sakal_logo
By
पी. बी. सिंह - सकाळ न्यूज नेटवर्क

अयोध्या - राम मंदिराच्या भूमिपूजनाची जय्यत तयारी अयोध्येत सुरू आहे. यासाठी २२. ६ किलो वजनाची शुद्ध चांदीची पहिली वीट तयार झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला येणार असल्याने सर्व व्यवस्था चोख ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी अयोध्येत तळ ठोकून आहेत. 

कार्यक्रमाला अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्याने सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव व्यंकटेश यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २७) झालेल्या बैठकीत याबाबत सूचना देण्यात आल्या. शहरात सर्वत्र स्वच्छता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घाटांचे सुशोभीकरणही करण्यात  येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

भूमिपूजनाचा कार्यक्रमाचे मंदिर स्थळाहून थेट प्रक्षेपण करण्‍यात येणार असल्याने मोठे पडदे उभारण्यात येत आहेत. संपूर्ण शहरासह आसपासच्या परिसरात रामनामाचा जयघोष ऐकू यावा यासाठी तीन हजारपेक्षा जास्त ध्वनिक्षेपकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. अयोध्या व फैजाबाद येथे ४ व ५ ऑगस्ट रोजी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. येथील प्रमुख मंदिरे व स्थळे विजेच्या दिव्यांची व पारंपरिक दिव्यांची रोषणाईने उजळणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुळशीपत्राच्या रूपात पाच कोटी 
प्रसिद्ध प्रवचनकार मुरारी बापू यांनी श्रीरामाच्या चरणी तुळशीपत्राच्या रूपात पाच कोटी रुपये भेट देणार असल्याचे म्हटले आहे.