shiva sharma death lucknow murder shraddha dubey
sakal
लखनौमधील व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित मॉडेल श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि चालक तन्वीर अली ऊर्फ दानिश यांना नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश विशेष कृती दल (यूपी एसटीएफ) आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या तिघांना ताब्यात घेतले. ट्रान्झिट रिमांडवर त्यांना बुधवारी लखनौमध्ये आणण्यात आले असून, हजरतगंज कोतवाली येथे त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि श्रद्धाचा मित्र व मॅनेजर आदिल यालाही एसटीएफने अटक केली आहे.