

Fake Bills Used to Siphon Off Funds in Prime Minister Housing Scheme Scam
sakal
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील झोपडपट्टी पुनर्वसन आणि प्रधानमंत्री आवास योजना (शहर) अंतर्गत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. बनावट बिले तयार करून कोट्यवधींचा सरकारी निधी लाटल्याचा गंभीर प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी कर्नाटक लोकायुक्त यांनी गुन्हा दाखल करून मंगळवारी (ता. १९) तपास सुरू केला.