अण्णा हजारेंचे 23 मार्चपासून दिल्ली येथे आंदोलन

मार्तंडराव बुचुडे
शनिवार, 17 मार्च 2018

राळेगणसिद्धी (नगर) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या विविध मागण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनापुर्वी देशभरात गेली तीन महिन्यांपासून हजारे देशभरात फिरत आहेत. वयाच्या 80 व्या वर्षीही हजारे यांच्य उत्साह कमी झाला नाही. त्यांनी या तीन महिन्यात जनजागृतीसाठी देशभरात सुमारे 42 हजार किलोमिटरचा हवाई व महामार्गावरील प्रवास करून 20 राज्यात 40 जनजागृती सभा घेतल्या आहेत.     

राळेगणसिद्धी (नगर) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या विविध मागण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनापुर्वी देशभरात गेली तीन महिन्यांपासून हजारे देशभरात फिरत आहेत. वयाच्या 80 व्या वर्षीही हजारे यांच्य उत्साह कमी झाला नाही. त्यांनी या तीन महिन्यात जनजागृतीसाठी देशभरात सुमारे 42 हजार किलोमिटरचा हवाई व महामार्गावरील प्रवास करून 20 राज्यात 40 जनजागृती सभा घेतल्या आहेत.     

हजारे यांनी लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करावी, व शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर अधारित बाजार भाव मिळावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, तसेच निवडणुक कायद्यात सुधारणा करावी या आणि इतर मागण्यासाठी हजारे 23 मार्चपासून दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनापुर्वी हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 43 वेळा या विविध मागण्या करणारी पत्रे पाठविली होती. मात्र पंतप्रधान मोदीं यांनी हजारे यांच्या पत्रांची कोणत्याच प्रकाची दखल घेतली नाही.

कोणत्याही पत्रावर कारवाई तर सोडाच साधे पत्राला उत्तरही दिले नाही त्यामुळे शेवटी हजारे यांनी आपल्या मागण्यासाठी 23 मार्च हा दिवस आंदोलनासाठी ठरवून दिल्ली येथे आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी देशभरात शेतकरी व जनता यांच्यात जनजागृती व्हावी व आंदोलनातील मागण्या काय आहेत हे जनतेला कळावे या साठी देशभारीतल 20 राज्यात दौरे करूण 40 पेक्षा अधिक सभा घेतल्या आहेत. त्यासाठी हजारे यांनी या वयातही माहामार्गावर चारचाकी वहानातून आठ हजार सातशे तर एकूण हवाई मार्गासह 24 हजार किमी प्रवास केला आहे.

या सभांना देशभरातून मोठा प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे हजारे यांचे मनोबल उंचावले आहे. मात्र दिल्लीत होण्याऱ्या आंदोलनासाठी विविध सरकारी यंत्रणांकडे आंदोलनासाठी जागा मिळावी म्हणून मागणी अर्ज दाखल केले आहेत. या साठी नऊ वेळा पत्र व्यवहारही केला आहे. मात्र अद्यापही हजारे यांच्या आंदोलनासाठी दिल्ली सरकारने जागा दिली नाही. त्यामुळे हजारे यांनी आंदोलनासाठी सरकराने जागा दिली नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्यासमोरच आंदोलन सुरू करण्याचे जाहिर केल आहे. जर तेथे पोलीसांनी अटक केली व तुरूंगात टाकले थेट तुरूगातच आंदोलन करण्याचेही हजारे यांनी या पुर्वीच जाहीर केले आहे.     

आंदोलनात लाखो लोक सहभागी होणार आहेत असे चित्र सध्या दिसत आहे. कारण अत्तापर्यंत अनेकांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी नांवे नोंदवली आहेत. अद्यापही नावनोंदणी सुरू आहे. तसेच आंदोलन दिल्लीत होत असले तरी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरही आंदोलन करावे असे हजारे यांनी जाहीर केले असल्याने देशभरात एकाच वेळी आंदोलन सुरू होणार असून लाखो लोक या आंदोलनात सभागी होतील असा आंदाज आहे.

Web Title: from 23rd march anna hajare starts agitation at delhi