esakal | दुर्दैवी! कर्नाटकात ऑक्सिजनअभावी 24 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Accident

राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांना शिवकुमार यांना सवाल केला आहे.

दुर्दैवी! कर्नाटकात ऑक्सिजनअभावी 24 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चामराजनगर : कर्नाटकातील चामराजनगर येथील सरकारी रुग्णालयात रविवारी (ता.२) ऑक्सिजनच्या (Oxygen) अभावामुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी २३ जण हे कोरोना (Coronavirus) संक्रमित होते, तर एका रुग्णाला इतर कारणामुळे ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, चामराजनगरमधील सरकारी रुग्णालयाला शेजारील म्हैसूर (Mysore) जिल्ह्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. पण रविवारी हा पुरवठा नेहमीप्रमाणे होऊ शकला नाही. परिणामी, ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात असून राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (24 patients dead at Chamrajnagar district due to oxygen shortage in Karnataka)

यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे. काँग्रेसच्या डी.के. शिवकुमार यांनी या अपघाताला सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांना शिवकुमार यांना सवाल केला आहे. राज्यात पुरेसा ऑक्सिजन आहे. पण उत्तर देण्यास कुणीही जबाबदार नाही. राज्य सरकार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सक्षम नाही. त्यामुळे आणखी किती जणांचा जीव जाईल?

हेही वाचा: भारत कोरोनाच्या विळख्यात; अमेरिका, यूके आणि जर्मनीकडून मदत

दरम्यान, दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच मंगळवारी आपत्कालीन कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री एस. सुरेश यांनी दिले आहे.

loading image