भारत कोरोनाच्या विळख्यात; अमेरिका, यूके आणि जर्मनीकडून मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 US Air force

उद्या मंगळवारी (ता.४) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक व्हर्चुअल बैठक होणार आहे.

भारत कोरोनाच्या विळख्यात; अमेरिका, यूके आणि जर्मनीकडून मदत

Fight with Corona : नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) काही कमी होण्याचं नाव घेईना. वाढती रुग्णसंख्या, ऑक्सिजन (Oxygen) आणि इतर सामग्रीचा निर्माण झालेला तुटवडा यामुळे कोरोनाचे संकट आणखी गडद होत चालले आहे. भारतात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या चार लाखाचा टप्पा लवकरच पार करेल, असेच चित्र सध्या दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांतून भारताला मदत पाठवली जात आहे. (125000 vials of Remdesivir arrived at Delhi Airport from USA)

अमेरिकेने वैद्यकीय मदत पुरविणार असल्याचे याआधी जाहीर केले होते. त्यानुसार रेमडेसिव्हिर औषधाच्या सव्वा लाख बाटल्या (कुपी) घेऊन आलेले विमान सोमवारी (ता.३) सकाळी दिल्लीत दाखल झाले.

हेही वाचा: पलानीस्वामींचा राजीनामा, स्टॅलिन होणार पहिल्यांदाच मुख्यमंत्री

दुसरीकडे भारतीय वायुसेनेने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कंबर कसली आहे. विविध देशातून भारतात किंवा देशांतर्गत कुठेही वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी सध्या भारतीय वायुसेना आघाडीवर दिसत आहे. के सी-१७ विमानाने जर्मनीहून ४ क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट करत हिंडन विमानतळावर पोहोचवले. तर ४५० ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ब्रिटनहून आलेले विमान चेन्नई विमानतळावर पोहोचले. याबाबतची माहिती भारतीय वायुसेनेने दिली आहे.

हेही वाचा: देशात लॉकडाउन हवाच, टास्क फोर्सची मागणी; केंद्र सरकार निर्णय घेणार?

परदेशातून आणखी वैद्यकीय साधनसामग्रीची वाहतूक करण्याची गरज भासली, तर भारतीय नौसेनेच्या जहाजांनाही तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आखाती देश आणि दक्षिण-पश्चिम आशियामधील देशांतून वाहतुकीसाठी मोठी क्षमता असलेल्या जहाजांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: IPL 2021: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द!

दरम्यान, उद्या मंगळवारी (ता.४) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक व्हर्चुअल बैठक होणार आहे. याआधीच ब्रिटनने भारताला १ हजार व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांची तब्येत सुधारण्यास मदत होईल. गेल्या आठवड्यात युकेने २०० व्हेटिंलेटर, ४९५ ऑक्सिजन कन्सट्रेटर्स आणि तीन ऑक्सिजन जनरेशन युनिट देण्याचे जाहीर केले होते.

Web Title: 125000 Vials Of Remdesivir Arrived At Delhi Airport From

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top