esakal | राजधानीत कोरोनाचा हाहाकार, 24 तासांत 412 रुग्णांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

राजधानीत कोरोनाचा हाहाकार, 24 तासांत 412 रुग्णांचा मृत्यू
राजधानीत कोरोनाचा हाहाकार, 24 तासांत 412 रुग्णांचा मृत्यू
sakal_logo
By
नामदेव कुंभार

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राजधानी दिल्लीतील परिस्थितीत हालाखीची झाली आहे. कोरोनानं दिल्लीमध्ये हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत राजधानी दिल्लीमध्ये 25 हजार 219 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ऑक्सजिन, बेड आणि इतर सुविधांअभावी अनेकांचा जीव जात आहे.

दिल्लीमध्ये शनिवारी कोरोना रुग्णांचा स्फोट झाला. दिवसभरात 25 हजार 219 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात राजधानीमध्ये 412 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी राजधानीमध्ये 375 रुग्णांचा मत्यू झाला होता. तर गुरुवारी 395, बुधवारी 368, मंगळवारी 381 आणि सोमवारी 380 रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीमध्ये कोरोनाच्या संक्रमणाचा दर देशात सर्वाधिक आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राजधानीतील कोरोना संक्रमणाचा दर 31.61 इतका आहे.

हेही वाचा: कोरोना काळात "आठ डॉक्टरांचे देवदूत कुटुंब" ठरतेय प्रेरक

दिल्लीच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राजधानीमध्ये आतापर्यंत 11 लाख 74 हजार 553 जण कोरोनाबाधित आहेत. यापैकी 10 लाख 61 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 16 हजार 559 जणांचा मृत्यू झालाय. राजधानी दिल्लीमऎध्ये 96 हजार 747 रुग्ण उपचाराधीन आहेत. दिल्लीमध्ये शनिवारी 79 हजार 780 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या.