26/11 Attack: संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीची मुंबईत बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

26/11 Attack

26/11 Attack: संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीची मुंबईत बैठक

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक या महिन्यात मुंबईमध्ये होणार आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत (26/11) झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यात संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य, देशांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या दूत रुचिरा कंबोज यांनी ही माहिती दिली.

मुंबईमध्ये होणाऱ्या, सभेत मुंबई हल्ल्यातील शहीदांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून सभेला सुरूवात होणार आहे. भारत सध्या 2022 साठी UN सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचा अध्यक्ष आहे. या समितीची बैठक 28-29 ऑक्टोबर रोजी मुंबई आणि नवी दिल्ली येथे होत आहे. यामध्ये भारत सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15 देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे आयोजन करणार आहे.

हेही वाचा: Jaideep Thackeray: शिंदे गटात गेलेल्या जयदेव ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंच्या पाठीशी? दिलं स्पष्टीकरण

कंबोज यांनी सांगितले की यूएनच्या विषेश समितीची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. आणि मुंबईमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना ही श्रद्धांजली असेल. यावेळी एक घोषणा देखील करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने 2008 मध्ये भारतात दहशतवादी पाठवून मुंबईत दहशतवादी हल्ला केला होता. यामध्ये 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. कंबोज यांनी सांगितले ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी समितीचे सदस्य श्रद्धांजली वाहणार तसेच मुंबई हल्ल्याच्या स्मारकावरही पुष्प अर्पण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Mumbai26/11 Attack Mumbai