ब्रिटिशांनी २८२ लोकांना फेकले होते विहिरीत, अवशेषांवरून समोर आली माहिती

Ajnala
Ajnalae sakal

नवी दिल्ली : जालियनवाला बाग हत्याकांडाच्या (Jaliyanwala Bag Massacre) ६१ वर्षांपूर्वी पंजाबमधील अजनाला (Ajnala Punjab) गावात नरसंहार झाला होता. या हत्याकांडात मृत्युमुखी पडलेले आणि विहिरीत फेकलेले 282 लोक गंगेच्या काठावरील उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमधील होते. बीएचयूसह पंजाब आणि सीसीएमबी (हैदराबाद) च्या शास्त्रज्ञांनी अजनाळ्याच्या जुन्या विहिरीतील अवशेषांचे डीएनए चाचणी आणि आयसोटोप अॅनालिसिसनंतर ही माहिती समोर आली आहे. प्रतिष्ठित फ्रंटियर्स इन जेनेटिक्स जर्नलमध्ये ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

Ajnala
'जालियनवाला हत्याकांडा'च्या बदल्यासाठी ब्रिटीश महाराणीच्या हत्येचा प्रयत्न

पंजाबमधील अजनाला शहरातील एका विहिरीत (कालियनवाला खोह) मानवी सांगाड्याचे अवशेष 2014 मध्ये सापडले होते. हे सांगाडे भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत मारल्या गेलेल्या लोकांचे होते, असे इतिहासकारांचे मत आहे, तर अनेक पुस्तकांमध्ये ठार झालेल्या कृष्णवर्णीय सैनिकांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड केल्याचा उल्लेख आहे. वास्तविकता जाणून घेण्यासाठी पंजाब विद्यापीठाचे मानववंशशास्त्रज्ञ डॉ. जे. एस. सेहरावत, बीएचयूचे जीन सायंटिस्ट प्रा. ज्ञानेश्वर चौबे, बिरबल साहनी इन्स्टिट्यूट, लखनौचे डॉ. नीरज राय आणि CCMB च्या शास्त्रज्ञांनी अवशेषांचा DNA आणि आयसोटोपचा अभ्यास केला. आठ वर्षे चाललेल्या या अभ्यासात हाडे, कवटी आणि दातांच्या डीएनए चाचण्यांमुळे मृत्यू झालेले सर्व उत्तर भारतीय वंशाचे असल्याची पुष्टी झाली आहे. १८५७ च्या क्रांतीपूर्वी त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध युद्ध पुकारले होते, असं यामधून समोर आले आहे.

संशोधन पथकाचे वरिष्ठ सदस्य जगमेंद्र सिंग सेहरावत म्हणतात की, या संशोधनात डीएनएचे ५० नमुने आणि आयसोटोपे अॅनालिसिसचे ८५ नमुने वापरण्यात आले. यामधून लोकांचा अनुवांशिक संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर विहिरीमध्ये सापडलेले मानवी सांगाडे हे पंजाब किंवा पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या लोकांचे नसून उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील लोकांसोबत डीएनए जुळत असल्याचे लक्षात आले.

''इंग्रजांनी शहिदांची नावे द्यावी''

या अभ्यासाच्या निष्कर्षामुळे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अगम्य वीरांचे बलिदान जोडले जाईल. ब्रिटीश सरकारने शहिदांची नावे द्यावीत जेणेकरून त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करता येतील. सोबतच या जघन्य गुन्ह्याबद्दल ब्रिटीश सरकारने भारताची माफीही मागावी, असे अजनाळ्याच्या डीएनए अभ्यासात महत्वाची भूमिका बजावणारे बीएचयूचे प्रा. ज्ञानेश्वर चौबे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com