Good News : वर्षाला ३ एलपीजी सिलेडर मोफत! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

3-lpg-cylinder-free-for-people
Good News : वर्षाला ३ एलपीजी सिलेडर मोफत! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

वर्षाला ३ एलपीजी सिलेडर मोफत! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचा मंत्रीमंडळाबरोबर काल शपथविधी झाला. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप सरकारने जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. त्यानुसार गोव्यात वर्षाला ३ एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.

हेही वाचा: Income Tax Return: इन्कम टॅक्स भरण्याइतका पगार नाहीये! तरीही भरा कर

निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने सत्तेत आल्यास गोवेकरांना वर्षाला ३ एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळतील असे आश्वासन जाहिरनाम्यात दिले होते. वर्षासाठी महिलांना ३ गॅस सिलिंडर मोफत, ज्येष्ठ नागरिकांना दयानंद सुरक्षा योजनेखाली मिळणारे मानधन वाढवून ३ हजार रुपये, सहा महिन्यांत कायदेशीर मार्गाने खाणी सुरु करणार, अशी प्रमुख अश्वासने जाहिरनाम्यात दिली गेली होती. त्यामुळे ३ सिलेंडरच्या आश्वासनाची पूर्तता आता होणार आहे. आमच्यासाठी ती केवळ आश्वासने नसून ते जनतेला दिलेले वचन आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या अभिभाषण मसुद्यालाही मंजुरी दिली आहे.

हेही वाचा: सन २०२५-२६ पर्यंत 'या' क्षेत्रात असतील १ कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी

Web Title: 3 Lpg Cylinder Free For People Said Chief Minster

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top