esakal | ONGC च्या तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण, नागालँड सीमेवर सापडली गाडी

बोलून बातमी शोधा

दहशतवाद्यांनी आसाममधील शिवसागर जिल्ह्यातून ओएनजीसी तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण केले आहे.

ONGC च्या तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण,नागालँड सीमेवर सापडली गाडी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गुवाहाटी - दहशतवाद्यांनी आसाममधील शिवसागर जिल्ह्यातून ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि.च्या (ओएनजीसी) तीन कर्मचाऱ्यांचे बुधवारी सकाळी अपहरण केले आहे. लकवा फिल्ड येथून या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. ओएनजीसीचे दोन ज्युनिअर इंजिनिअर (प्रॉडक्शन) आणि एका ज्यूनिअर टेक्निशियनचा समावेश आहे. या दहशतवाद्यांनी ओएनजीसीच्याच गाडीतून या कर्मचाऱ्यांचे अपहरण केले. ही गाडी नागालँड-आसाम सीमेजवळील निमोनगडच्या जंगलात बेवारस स्थितीत आढळून आली आहे.

मोहिनी मोहन गोगोई, रितूल सैकिया आणि अलाकेश सैकिया असे अपहरण झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ओएनजीसीने आपल्या निवेदनात म्हटले की, अज्ञात सशस्त्र लोकांनी 21 एप्रिल रोजी पहाटे दोन ज्युनिअर इंजिनिअर आणि एका ज्युनिअर टेक्निशियनचे अपहरण केले. शिवसागर जिल्ह्यातील लकवा फिल्ड येथून हे अपहरण करण्यात आले आहे.

पोलिसांकडून शोध मोहीम सुरु

शिवसागर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अमिताव सिन्हा म्हणाले की, एका सशस्त्र दहशतवादी गटाने लकवा फिल्ड येथून ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण केले आहे. अपहत कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी आम्ही संशयित परिसरात अभियान सुरु केले आहे. हे अपहरण कोणत्या गटाने केले आहे, हे अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी ओएनजीसीने तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा: 'नमस्कार उद्धव साहेब...अजित दादा', चिमुकलीने मांडलं कलाकारांचं दु:ख

दरम्यान, शोध मोहीम तीव्र करण्यात आली असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत. पोलिसांनी चौकशीसाठी अनेकांना ताब्यातही घेतले आहे.