
काळवीटाला मारून नेत होते... पोलीस येताच चकमक, ३ पोलिसांचा मृत्यू
काळविटाचे शिकारी आणि पोलिसांच्यात झालेल्या चकमकीत सब इन्स्पेक्टरसह ३ पोलिसांचा मृत्यू झालाय. मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्याचे एसपी राजीवकुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोन या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जंगल क्षेत्रात शिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल अशा तीन पोलिसांवर गोळीबार केला, यात तिघांचाही मृत्यू झालाय. (3 police died in poachers attack)
आरोन जंगलात ४ काळविटांची आणि एका मोराची शिकार करुन शिकारी परतत असताना पोलिसांशी त्यांचा सामना झाला. यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला, ५० राउंड फायर करण्यात आले. मात्र शिकाऱ्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला. यात सब इन्स्पेक्टर राजकुमार जाटव, हेड कॉन्स्टेबल संतराम मीना, आणि कॉन्स्टेबल नीरज भार्गव यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. एवढंच नाही तर शिकाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीच्या ड्रायव्हवर देखील गोळीबार केलाय.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहानी याविरोधात कडक शिक्षेची मागणी केलीय. दिग्विजय सिंहानी ट्वीट करत घटनेचा निषेध करत शिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केलीय.
या घटनेनंतर शिकारी पोलिसांची रायफल घेऊन फरार झालेत, शिकारी दुचाकीवर आले असल्याची माहिती मिळतेय. काळविट आणि राष्ट्रीय पक्षी मोराच्या शिकारीवर बंदी आहे.
Web Title: 3 Police Died In Black Buck Poachers Attack In Guna District Of Madhya Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..