esakal | काश्मीरमध्ये आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा; चकमक सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

3 Terrorists Killed In Encounter In Jammu And Kashmirs Shopian

काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात जवान व दहशतवाद्यांमध्ये आज (ता. २९) पुन्हा चकमक झाली. काल (ता. २८) सुरू झालेल्या या चकमकीत आतापर्यंत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

काश्मीरमध्ये आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा; चकमक सुरूच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जम्मू  : काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात जवान व दहशतवाद्यांमध्ये आज (ता. २९) पुन्हा चकमक झाली. काल (ता. २८) सुरू झालेल्या या चकमकीत आतापर्यंत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मेल्होरा भागात झालेल्या चकमकीत एक मेजर देखील जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शोपिया जिल्ह्यातील जैनपोर भागातील मेल्होरा गावात दोन दहशतवादी दडून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर या भागात शोध मोहीम राबवण्यात आली. दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. जवानांकडूनही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. ज्यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममधील लोअर मुंडा परिसरात दोन दिवसांपूर्वी जवानांकडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

जगातील अन्य देशांप्रमाणे पाकिस्तानही कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. पण या परिस्थितीतही पाकिस्तान सुधारलेला नाही. दहशतवादाला खतपाणी घालण्याचे त्यांचे उद्योग सुरुच आहेत. काश्मीरमधील १४ लाँच पॅडसवर मोठया संख्येने दहशतवादी थांबले आहेत. हे सर्व दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.