कोरोनाच्या भीतीनं पाच जणांनी घेतलं विष, ३ वर्षांच्या बाळासह आईचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

two died due to fear of corona

कोरोनाच्या भीतीनं पाच जणांनी घेतलं विष, ३ वर्षांच्या बाळासह आईचा मृत्यू

चेन्नई : घरातील एका महिलेचा कोरोना (Corona) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आपआपल्याही कोरोना होईल या भीतीनं अख्ख्या कुटुंबानं विषप्राशन केले. यामध्ये दुर्दैवाने २३ वर्षीय आई आणि ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. तसेच घरातील इतर तीन जण बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: शारीरिक संबंधासाठी जोडीदाराची अदलाबदली, मोठ्या रॅकेटचा भंडाफोड

कुटुंबामध्ये पाच सदस्य होते. तमिळनाडूमधील मदुराई (Madurai Tamil Nadu) जिल्ह्यातील सक्कीमंगलम येथे हे कुटुंब वास्तव्यास आहे. यामध्ये लक्ष्मी (४६), मुलगा सिबीराज (१३), दुसरा मुलगा अधी (१६), मुलगी जोतिका (२३) आणि नातू रितीश (३ वर्ष) यांचा समावेश आहे. लक्ष्मीचे पती नागराज हे मोलमजुरी करून कुटुंबाचं पालनपोषण करायचे. पण, डिसेंबर महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. त्या धक्क्यातून अजूनही कुटुंब सावरले नाही. त्यामुळे लक्ष्मी नैराश्येत गेली होती.

मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह -

ज्योतिकाचं लग्न झालं होतं. मात्र, ती सुद्धा तीन वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी राहायची. काही दिवसांपूर्वी ज्योतिकाला कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्यानंतर ती जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेली असता कोरोना चाचणी करण्यात आली. शनिवारी ती पॉझिटिव्ह आढळून आली. तिने ही माहिती तिच्या आईला दिली. घरातील सर्वांना कोरोनाची लागण होईल या भीतीनं सर्वांनी विष घेण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मी यांनी त्यांचे दोन मुलं, एक मुलगी आणि नातवासह सर्वांनी शेणाची भूकटी खाल्ली. कुटुंबातील एकही सदस्य रविवारी सकाळी घराबाहेर दिसला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरात डोकावून बघितले असता ज्योतिका आणि तिच्या लहान मुलाचा मृत्यू झाला होता, तर एकाने कमी पावडर खाल्ल्याने तो सुस्थितीत होता, तर लक्ष्मी आणि तिचा मुलगा अत्यवस्थ आहेत. शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असून दोघा मायलेकांना सरकार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. याबाबत टाइम्स ऑफ इंडियानं वृत्त दिले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tamil Nadu
loading image
go to top