

308-Wheel Truck's Mega Journey
Esakal
उत्तर प्रदेशातल्या चंदौली जिल्ह्यात ३०८ चाकांच्या लांबलचक ट्रकची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. या ट्रकवरून २०० टन वजनाचं वेसल वाहून नेलं जात आहे. बेल्जियमहून समुद्रमार्गे भारतात आणलेलं हे वेसल ओडिशातल्या पारादीप बंदरातून उत्तर प्रदेशातल्या बलरामपूर इथल्या साखर कारखान्यात नेण्यात येत आहे. सध्या हा ट्रक चंदौलीत थांबवण्यात आलाय. पुढे जाण्यासाठी परवानगी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी प्रतीक्षा केली जातेय.