31 मार्च ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार; आंबेडकरांना मिळाला होता भारतरत्न

babasaheb_20ambedkar.
babasaheb_20ambedkar.

नवी दिल्ली- वर्षांतील ३६५ दिवसात विविध प्रकारच्या घटना घडत असतात. त्यातील काही चांगल्या असतात तर काही वाईट. ३१ मार्च या दिवशीही अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. याच दिवशी संविधानाचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांना ३१ मार्च १९९० रोजी मरणोत्तर सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. देशासाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य असं आहे. बाबासाहेब आंबडेकरांनी भारताच्या स्वातंत्र्य लढाईत सक्रियरित्या भाग घेतला होता. त्यांनी आयुष्यभर सामाजिक भेदभावाविरोधात लढाई केली. स्वातंत्र्यानंतर त्यांची भूमिका इतकी वाढली की संविधान निर्मितीचे महत्त्वाचे कार्य त्यांच्यावर सोपवण्यात आले.  

जगासह देशात 31 मार्चला घडलेल्या इतर महत्वाच्या घटना

1504- शीखांचे गुरु अंगद देव यांचा जन्म. ते गुरु नानक देव यांच्यानंतर शीखांचे दुसरे गुरु होते. 
1727- महान वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांचे वयाच्या 84 व्या वर्षी लंडनमध्ये निधन
1774- भारतात टपालसेवा सुरु, पहिले टपालघर सुरु झाले
1870- अमेरिकेत पहिल्यांदा एका कृष्णवर्णीय नागरिकाने मतदान केले. कृष्णवर्णीय नागरिकांना अधिकार मिळण्याच्या दिशेने हा एक ऐतिहासिक विजय होता. 
1889- पॅरिसमधील प्रसिद्ध Eiffel Tower अधिकृतरित्या सुरु झाले
1921- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या झेंड्याचा स्वीकार झाला
1959- तिबेट धर्मगुरु दलाई लामा यांनी आपल्या २० शिष्यांसह भारतीय सीमेत प्रवेश केला. त्यांनी 17  मार्चला तिबेटची राजधानी ल्हासा सोडलं होतं. 
1964- मुंबईमध्ये इलेक्ट्रिकवर चालवली जाणारी ट्राम बंद करण्यात आली
1980- अमेरिकेचे महान धावपटू जेसी ओवंस यांचे निधन. त्यांनी १९३६ च्या ऑलम्पिक स्पर्धेत आपल्या देशासाठी चार सुवर्णपदके जिंकली होती.
1980- शेवटचे आयसीएस अधिकारी निर्मल मुखर्जी सेवानिवृत्त झाले
1981- कोलंम्बियामध्ये झालेल्या भूंकपात जवळपास ५ हजार लोकांचा मृत्यू
1990- संविधान निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांना सर्वाच्च नागरिक सन्मान भारतरत्न देण्यात आला.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com