नवी दिल्ली - पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले ३२ विमानतळ नागरी वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आली. उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील ही विमानतळ सात मे रोजी बंद करण्यात आली होती. पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर स्थिती सामान्य होत आहे. त्यामुळे विमानतळ पुन्हा सुरू केले जात असल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून (एएआय) सांगण्यात आले.