बाळाचे नाव ‘लॉकडाउन’,‘करुणा’असे ठेवले..वाचा सविस्तर

baby
baby
Updated on

नवी दिल्ली - कोरोनामुळे अनेक स्थलांतरित मजूरांना नोकऱ्या सोडून आपल्या गावी परतावे लागले. त्यांच्यासाठी सरकारने श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सोडल्या. प्रचंड तणावाच्या आणि त्रासाच्या याकाळात बहुतांश मजूरांचा श्रमिक रेल्वेचा प्रवास मात्र संस्मरणीय ठरला. या प्रवासात प्रसूत झालेल्या ३५ हून अधिक गर्भवतींना माणुसकीचे दर्शन घडले. या महिलांना प्रवाशांबरोबरच रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही मोठी मदत केली. या प्रसंगांची आठवण म्हणून काहींनी आपल्या बाळाचे नाव ‘लॉकडाउन’, ‘करुणा’ असे ठेवले आहे.

मुलीचे नाव ‘करुणा’
भोपाळहून श्रमिक रेल्वेमधून छत्तीसगडमधील आपल्या गावी निघालेल्या ईश्वरीदेवी यांना प्रवासादरम्यान मुलगी झाली. नवऱ्याची नोकरी गेल्याने जेवणाचे हाल झाल्यास गरोदर पत्नीला त्रास होईल, त्यामुळे गावी जाण्यासाठी हे कुटुंब रेल्वेने निघाले होते. मात्र प्रवासातच ईश्वरीदेवींना कळा सुरू झाल्याने प्रवाशांनी जागा मोकळी करून देत आणि लागेल ती मदत करत या कुटूंबाला आधार दिला. मुलगी झाल्यावरही डब्यात जल्लोष करण्यात आला. अडचणीच्या काळातील माणुसकीचे हे रूप पाहून मुलीचे ‘करुणा’ असे नाव ठेवले. 

कायमस्वरूपी आठवण
मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रीना यादव यांना प्रवासात मुलगा झाला. लॉकडाउनमुळे नवऱ्याची नोकरी जाऊन संकट निर्माण झाले होते. त्यामुळे गर्भवती असतानाही रीना यांना गावाकडे जाण्यासाठी प्रवास करावा लागला. या संकटाची आठवण कायम रहावी म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘लॉकडाउन’ ठेवले. 

उपयोगी पडल्याचा आनंद
आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्याची आमच्याकडे यंत्रणा असल्याचे रेल्वेचे प्रवक्ते आर. डी. वाजपेयी यांनी सांगितले. ‘प्रवाशाला काही मदत लागल्यास रेल्वेमध्ये हजर असलेले आमचे सहकारी पुढील स्थानकाशी संपर्क साधतात. लगेचच जवळच असलेल्या रेल्वे कॉलनीतील डॉक्टर गाडी स्थानकावर यायच्या आत उपलब्ध होतात. श्रमिक रेल्वेगाडीमध्ये प्रसूती झालेल्या प्रत्येकीला आम्ही मदत करू शकलो आणि प्रत्येक माता व नवजात बाळाला सुखरूप पोहचवू शकलो, याचा आनंद आहे,’ असे वाजपेयी यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

डब्याचे रूपांतर लेबर रूममध्ये
जामनगरहून मुझफ्फरपूरला एकटीनेच चाललेल्या ममता यादव यांना प्रसव कळा सुरू होताच प्रवाशांनी तातडीने त्यांच्यासाठी डबा मोकळा करून दिला. डॉक्टर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना हवी ती मदत केल्याने ममता यांच्या प्रसूतीमध्ये कोणतीही अडचण न येता त्यांनी निरोगी मुलाला जन्म दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com