
केंद्राकडून महाराष्ट्राला ३५५ कोटी रुपये, नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई
नवी दिल्ली : गतवर्षी पूर, भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीच्या भरपाईसाठी केंद्रातर्फे महाराष्ट्रासह सहा राज्यांना १६८२ कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. यातील ३५५.३९ कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहे. राज्यांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेण्यासाठी आंतरमंत्रालयीन पथक केंद्रातर्फे पाठविले जाते. या पथकाच्या शिफारशींच्या आधारे अर्थसाहाय्य केले जाते.
त्यानुसार गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू साठी १६६४.२५ कोटी रुपये आणि पुद्दुचेरीसाठी १७.८६ कोटी रुपये असे एकूण १६८२.११ कोटी रुपयांची मदत २०२१ च्या नैसर्गिक आपत्तींसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (एनडीआरएफ) मदत जाहीर झाली. हे अर्थसाहाय्य राज्यांना दिल्या जाणाऱ्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) व्यतिरिक्त आहे. २०२१-२२ या वर्षात केंद्र सरकारने ‘एसडीआरएफ’अंतर्गत २८ राज्यांना १७,७४७.२० कोटी रुपये आणि ‘एनडीआरएफ’अंतर्गत ४६४५.९२ कोटी रुपये आठ राज्यांना दिले आहेत.
अशी मिळणार मदत...
महाराष्ट्र ३५५.३९
आंध्र ३५१.४३
हिमाचल ११२.१९
कर्नाटक ४९२.३९
तमिळनाडू ३५२.८५
Web Title: 355 Crore Sanctioned To Maharashtra National Disaster Fund
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..