जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा; चकमक सुरुच

वृत्तसंस्था
Wednesday, 22 April 2020

जम्मू-काश्मीरमधील शोपीयानमध्ये जवानांनी आज (ता. २२) पहाटे केलेल्या ऑपरेशन मेलाहूरामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा कराण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपीयानमध्ये जवानांनी आज (ता. २२) पहाटे केलेल्या ऑपरेशन मेलाहूरामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा कराण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. या भागात अद्यापही चकमक सुरू असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा जगभरात प्रादुर्भाव वाढत असतानाही पाकिस्तान नियंत्रण शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहेत, गेल्या काही आठवड्यांपासून घुसखोरांना काश्मीरमध्ये घुसविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणांना भेटी दिल्या. लष्कराला दक्ष राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराकडून दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले करण्यात येत असून पाकिस्तानातून घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्यापूर्वीच त्यांचा बंदोबस्त करण्यात येत आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले होते. देश करोनाशी लढा देत असताना लष्करही महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि सशस्त्र दले देशाचे रक्षण करण्यासाठी सिद्ध आहेत, सशस्त्र दले कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत, भारताचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी देशाला आश्वस्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 terrorists killed in encounter with security forces in Jammu and Kashmirs Shopian