
चेन्नई : तामिळनाडूतील तिरुनेलवेली (Tamil Nadu) जिल्ह्यात 300 फूट खोल खुल्या खाणीत ट्रकमधून कोळसा वाहून नेणारे चार मजूर अडकले. काल रात्रीपासून सर्वजण तिथेच अडकले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरांची संख्या सहा होती. मात्र, आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.
तिरुनेलवेली जिल्ह्य़ातील मुनीर पल्लम भागात कोळसा खाण आहे. इथून दररोज बाहेर कोळसा जातो. पण, शनिवारी मजूर काम करत असताना या ३०० फूट खोल खाणात दगड घसरले. त्यामुळे कामगारांना त्यांचे ट्रक बाहेर काढता आले नाहीत. सुरुवातीला सहा मजूर अडकल्याचे माहिती होती. अग्निशमन दलाच्या पथकाने दोन जणांना वाचवले आहे. यासोबतच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. अवजड क्रेन आणि खाणीत उतरण्यात तज्ज्ञ असलेले लोक, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून बचाव सुरू आहे. त्याचवेळी बचावकार्यासाठी रविवारी सकाळी हेलिकॉप्टरही मागवण्यात आले आहे, असे दक्षिणी रेंजचे आयजी आसरा गर्ग यांनी सांगितले.
खाणीची रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यामुळे सर्व अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. या क्षणी फक्त चार कामगार अडकल्याची माहिती आहे. पण, आणखी काही मजूर अडकले असण्याची शक्यता आहे, असंही गर्ग म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.