दिल्लीत पुन्हा लागली आग, यावेळी 40 जणांना...

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

आज पहाटे दोनच्या सुमारास ही आग लागली. इमारतीत राहत असलेल्या सुमारे 40 नागरिकांनी टेरेसवर आश्रय घेतला. तेथून या नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आगीच्या घटना सुरुच असून, आज (गुरुवार) पहाटे पूर्व दिल्लीतील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीतून 40 जणांना सुखरूप वाचविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पूर्व दिल्लीतील कृष्णनगर भागात आज पहाटे चार मजली इमारतीला आग लागली. या इमारतीच्या तळ मजल्यावर प्लॅस्टिक ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. 

दोन लाखांवरील पीककर्ज माफीचा विचार - उद्धव ठाकरे

आज पहाटे दोनच्या सुमारास ही आग लागली. इमारतीत राहत असलेल्या सुमारे 40 नागरिकांनी टेरेसवर आश्रय घेतला. तेथून या नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. दिल्लीत नुकतीच अनाज मंडी येथील कारखाऩ्यांना लागलेल्या आगीत 45 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या आठवड्यात आगीची घटना घडली होती. त्यातही नऊ जणांना जीव गमवावा लागला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 People Rescued After Fire Broke Out In Building In Delhi