४० टक्के श्रमिक ट्रेन पोहचल्या ८ तास उशिरा; रेल्वेने सांगितलं 'हे' कारण

वृत्तसंस्था
Sunday, 31 May 2020

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अडकलेल्या प्रवासी मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. पण, या श्रमिक स्पेशल ट्रेन उशिरा धावत असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. श्रमिक स्पेशल ट्रेनपैकी ४० टक्के ट्रेन या जवळपास ८ तास उशिराने धावत असल्याचं एका अहवलातून समोर आले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अडकलेल्या प्रवासी मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. पण, या श्रमिक स्पेशल ट्रेन उशिरा धावत असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. श्रमिक स्पेशल ट्रेनपैकी ४० टक्के ट्रेन या जवळपास ८ तास उशिराने धावत असल्याचं एका अहवलातून समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एका अहवालानुसार, १ मेपासून आतापर्यंत जवळपास ३७४० श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात आल्या. या ट्रेनमधून २०लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. यादरम्यान ४० टक्के ट्रेन उशिराने धावल्या. एक ट्रेन जवळपास ८ तास उशिराने धावत होती. ४२१ ट्रेन १० तास किंवा त्याहून अधिक काळ उशिराने धावल्या. तर ३७३ श्रमिक स्पेशल ट्रेन १० ते २४ तास लेट होत्या. ७८ ट्रेन एक दिवस किंवा त्याहून अधिक काळ उशिरा होत्या. तर ४३ ट्रेन अशा होत्या ज्या ३० तास किंवा त्याहून अधिक दोन-तीन दिवस आपल्या निर्धारित वेळेहून उशिराने धावल्या आहेत. बिहार, उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या बहुतांश ट्रेन उशिराने धावल्या. ७८ ट्रेन ज्या सर्वाधिक उशिरा धावल्या त्या महाराष्ट्र आणि गुजरातमधून निघणाऱ्या होत्या.
-------
दिल्लीतील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे संचालक कोरोना पॉझिटिव्ह
-------
...अखेर स्पेस एक्सचे रॉकेट अवकाशात झेपावले
-------
ती आमची चुकच : अमित शाहांची कबुली
--------
रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ट्रेन उशिरा धावण्याचं कारणं म्हणजे, रुळांवर ट्रेनची संख्या वाढणं, म्हणजे एकाच दिशेने अधिक ट्रेन जाणं. अधिकतर ट्रेन यूपी, बिहारकडे जात होत्या. त्यामुळे अशा मार्गांवर ट्रेनचा दबाव वाढला. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार, ट्रेनचे मार्ग बदलले जातात, बंगाल-ओडिशामध्ये अम्फान वादळामुळे ट्रेनचे मार्ग बदलले गेले. कोणत्याही एका रेल्वे मार्गावर २४ तासांत ट्रेन चालवण्याची मर्यादा असते परंतु एकाच मार्गावर अधिक ट्रेन आल्याने कोंडी होत असल्याचाही परिणाम ट्रेनच्या वेळेवर होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 percent shramik trains late average delay 8 hours