esakal | चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

425 COVID-19 Deaths In 24 Hours In India, Higher Than US

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच भारतासाठी आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारतात गेल्या २४ तासात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मृत्यू झाले आहेत.

चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच भारतासाठी आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारतात गेल्या २४ तासात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासात भारतात  ४२५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. जगात फक्त ब्राझिलमध्ये भारतापेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. ब्राझिलमध्ये काल (ता. ०६) ६०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेपेक्षा कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक असल्याची नोंद काल भारतात झाली आहे. नोंद झाली आहे. २९ लाख कोरोनाबाधित रुग्ण असणाऱ्या अमेरिकेत गेल्या २४ तासात २७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत भारतात १९ हजार ६९३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे अमेरिकेत १ लाख २९ हजार ९४७ मृत्यूंची नोंद झाली असून ब्राझिलमध्ये ही संख्या ६४ हजार ८६७ आहे. एका आठवड्यापूर्वी ३ टक्के आणि दोन आठवड्यांपूर्वी ३.२ टक्के असणारा भारतातील मृत्यूदर २.८ वर पोहोचला आहे. अमेरिका आणि ब्राझिलशी तुलना करता तेथील मृत्यूदर अनुक्रमे ४.५ आणि ४.१ टक्के आहे. जागतिक मृत्यूदर ४.७ टक्के आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर अमेरिका, ब्राझिल आणि भारत हे देश आहेत.

दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्या सात लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत २४ हजार २४८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ६ लाख ९७ हजार ४१३ झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी म्हटले होते. मात्र, सायंकाळपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे देशातील रुग्णसंख्येने सात लाखांचा टप्पा पार केल्याचे स्पष्ट झाले. देशात पाच दिवसांमध्ये १ लाख रुग्ण वाढले असून सलग तीन दिवस प्रतिदिन २० हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. कोरोनासाठी झालेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित नमुन्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६.७३ टक्के आहे. दिल्लीमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. पण, कोरोनाबाधित रुग्णांचे सरासरी प्रमाण कमी होऊ लागले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीत प्रतिदिन १८ हजार चाचण्या घेतल्या जात आहेत.