43 died in lightning strikes in Bihar and Uttar Pradesh
43 died in lightning strikes in Bihar and Uttar Pradesh

उत्तरप्रदेश, बिहारमध्ये एकाच दिवसात वीज कोसळून तब्बल ४३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळल्याने काल (ता. ०४) शनिवारी एकाच दिवसात जवळपास ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला. परंतु वीज कोसळल्याने २३ जणांचा मृत्यू झाला आहे तर २९ जण होरपळले आहेत. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमध्ये आठ, मिर्जापूरमध्ये सहा, भिदोईत सहा, कौशांबीमध्ये दोन तर जौनपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर बिहारमध्ये वीज कोसळून २० जणांचा मृत्यू झाला आहे. भोजपूर ९, सारण ५, कैमूर ३, पटना २ तर बक्सरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पटनामधील हवामान खात्याकडून पुढील ४८ तासांतही, राज्यातील अनेक भागात पावसासह वीज कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांना शेतात न जाण्याचं सांगण्यात आलं आहे. हवामान खात्याकडून राज्यातील अनेक भागात ०६ जुलैपर्यंत ऑरेंज आणि ब्लू अलर्ट जारी करण्यात आला असून सावधानतेचा इशार देण्यात आला आहे.

तत्पूर्वी, यापूर्वी, २५ जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने, वादळामुळे मोठी हानी झाली होती. वीज पडून तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशमध्येही वीज कोसळून यापूर्वी २४ जणांचा बळी गेला होता. पटना, मुजफ्फरपूर, भोजपूर, बक्सरसह अनेक जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे येथील काही भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com