esakal | देशात २४ तासांत ४३,२६३ कोरोनाचे नवे रुग्ण, ३३८ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

देशात २४ तासांत ४३,२६३ कोरोनाचे नवे रुग्ण, ३३८ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग मंदावला आहे. मात्र, तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४३,२६३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून (India corona update) आले, तर ४०,५६७ जणांनी कोरोनावर मात केली. तसेच गेल्या २४ तासांत ३३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

हेही वाचा: लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढण्याची भीती? लसीकरणाची शक्यता कमीच

गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचा आलेख घसरताना दिसतोय. दररोज ५० हजाराच्या वर असणारी रुग्णसंख्या आता ५० हजारांच्या खाली आली. सध्या देशात ३,९३,६१४ सक्रीय रुग्ण असून आतापर्यंत ३,३१,३९,९८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत ३,२३,०४,६१८ जणांनी कोरोना मात केली असून ४,४१,७४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असून, रिकव्हरी रेट हा ९७.४८ टक्के इतका झाला आहे.

अद्यापही अनेकांचे कोरोना लसीकरण बाकी आहे. तसेच सणासुदीचा काळ आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट ही उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अनेक ठिकाणी डेल्टा प्लसचे अनेक रुग्ण सापडत असून त्याचं संक्रमण वेगाने पसरत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तिसरी लाट पूर्णपणे रोखायची असेल तर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी गर्दी करू नये, सर्व कोरोना नियमांचे पालन करूनच सण-उत्सव साजरे करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

loading image
go to top