esakal | लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढण्याची भीती? नोव्हेंबरमध्ये लसीकरणाची शक्यता कमीच
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढण्याची भीती? लसीकरणाची शक्यता कमीच

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाशी लढ्यात लसीकरण (corona vaccination drive) एक संरक्षणात्मक ढाल ठरत आहे. त्यात तिसऱ्या लाटेत (third wave of corona) लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर लसीकरणाची लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल झाली. अद्यापही रक्त चाचण्यांची प्रक्रिया सुरू आहे. तिसरी लाट सप्टेंबर- ऑक्‍टोंबरमध्ये आल्यास नागपूर जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील सुमारे १२ लाख मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे कवच (child corona vaccination) नसणार हे स्पष्ट झाले. यामुळे कोरोनापासून मुलांचा बचावाचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

हेही वाचा: खासदार तडस यांच्या कौटुंबिक वादात मोठा ट्विस्ट, मुलगा-सुनेचं वैदीक पद्धतीनं लग्न

कोरोनासंसर्गाच्या पहिल्या लाटेत ८५ टक्के वृद्धांना फटका बसला होता. दुसऱ्या लाटेत २१ ते ४० वयोगटातील युवकही मोठ्या प्रमाणात बाधित झाले. यात १८ वर्षे वयोगटातील ४ टक्के मुलांनाही कोरोनाचा विळखा बसला होता. नुकतेच राज्यात आढळून आलेल्या डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये १० मुले ही १८ वर्षांखालील आहेत. यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनासंसर्ग वाढण्याची भीती आहे. विशेष असे की, लहान मुलांना कोरोना झाल्यानंतर लक्षणे दिसून येत नाही.

२०११ मध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील २ लाख ५७ हजार ४३८ मुले आणि २ लाख ३९ हजार ६४९ मुली होत्या. यात २०२१ मध्ये यात दीडपटीने वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागात ० ते १८ वर्षे वयोगटातील मुले, मुलींची संख्या ५ लाख ७३ हजार २९४ होती. यात दीडपट वाढ झाली. याचा सारासार विचार करता शहर आणि ग्रामीण मिळून ० ते १८ वर्षो वयोगटातील मुलांची संख्या १२ लाखाहून अधिक मुले लसीकरणासाठी पात्र ठरतील.

नोव्हेंबरपर्यंत लसीकरण सुरू होण्याची शक्यता नाही -

जिल्ह्यात सध्या १८ वर्षांवरील, ४५ वर्षांपेक्षा जास्त व ६० वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण होत आहे. एका दिवसात २०० केंद्रावर सरासरी २० हजाराहून अधिक लोकांना लस दिली जात आहे. या क्षमतेनुसार लसीकरण झाले तर सुमारे ८० दिवस लसीकरणाला लागतील. नोव्हेंबरपर्यंत मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता नसल्याची चर्चा वैद्यक तज्ज्ञांमध्ये आहे. यामुळे १२ लाख मुलांना पहिला लसीकरणाचा पहिला डोस डिसेंबरमध्येच मिळेल. दुसरा डोस २०२२ उजाडेल असे तज्ज्ञ सांगतात.

नागपुरात २ ते ६, ६ ते १२ आणि १२ ते १८ या वयोगटातील ९० मुलांवर कोरोना लस चाचणी ऑगस्ट २०२१ सुरू होती. आता या मुलांच्या रक्तात ॲन्टिबॉडीज किती प्रमाणात तयार होत आहेत, याची तपासणी प्रक्रिया सुरू आहे. मुलांचे रक्त घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येते. रक्तातील ॲन्टिबॉडीज तपासण्याची प्रक्रिया पुढील दोन महिने चालेल. यामुळे दोन महिन्यानंतरच लसीकरणाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
-डॉ. वसंत खळतकर, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ, नागपूर.
loading image
go to top