Happy Birthday Sachin : मास्टर-ब्लास्टर सचिनचा आज 46वा वाढदिवस!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

भारताचा भरवशाचा सलामीवीर , तंत्रशुद्ध आणि फटकेबाज फलंदाज, भल्या भल्या गोलंदाजांची धुलाई करणारा, उंचीने कमी पण कर्तृत्वाने महान अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 46वा वाढदिवस. 

मुंबई : भारताचा भरवशाचा सलामीवीर , तंत्रशुद्ध आणि फटकेबाज फलंदाज, भल्या भल्या गोलंदाजांची धुलाई करणारा, उंचीने कमी पण कर्तृत्वाने महान अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 46वा वाढदिवस. 

दादरच्या एका महाराष्ट्रीय कुटुंबात त्याचा 1973मध्ये जन्म झालेला. त्याच्या वडिलांनी दिग्गज संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरुन त्याचे नाव सचिन असे ठेवले होते. 

त्याने 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरवात केली. सचिनने त्याच्या तब्बल 20 वर्षांच्या कारकिर्दीत 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय सामने खएळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थोडी थोडकी नाही तर शंभर शतके झळकाविली आहेत तर एकूण 34,357 धावा केल्या आहेत. 

क्रिकेटजगातील देव असी ओळख असलेल्या सचिनवर आज जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 46 th birthday of cricketer Sachin Tendulkar