नरेंद्र मोदींना ट्विटरवर पाच कोटी फॉलोअर्स

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नेते................फॉलअर्सची संख्या
नरेंद्र मोदी - 5 कोटी
अरविंद केजरीवाल - 1.54 कोटी
अमित शहा - 1.52 कोटी
राजनाथसिंह - 1.41 कोटी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या सोमवारी पाच कोटी झाली, त्यामुळे सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्यांच्या यादीत मोदी हे 20व्या क्रमांकावर असून, टॉप-20 मध्ये पोचणारे ते एकमेव भारतीय व्यक्ती ठरले आहेत.

ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्यांच्या यादीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यांना एकूण 10 कोटी आठ लाख फॉलोअर्स आहेत, तर अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मोदींच्या फॉलोअर्सची संख्या एक कोटी 40 लाखांनी कमी आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) अधिकृत ट्विटर अकाउंटच्या फॉलोअर्सची संख्या तीन कोटी झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2009 मध्ये मोदी यांनी ट्विटर अकाउंट सुरू केले होते. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली.

नेते................फॉलअर्सची संख्या
नरेंद्र मोदी - 5 कोटी
अरविंद केजरीवाल - 1.54 कोटी
अमित शहा - 1.52 कोटी
राजनाथसिंह - 1.41 कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 crore followers on narendra modi twitter