देशातील टॉप 5 बॅंकांच्या प्रमुखांचे पगार माहिती आहेत?

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

आदित्य पुरी: एचडीएफसी बॅंक:  वार्षिक वेतन 10 कोटी 68 लाख रुपये 
अमिताभ चौधरी: अॅक्सिस बॅंक : वार्षिक वेतन  3.60 कोटी रुपये 
उदय कोटक:  कोटक महिंद्रा बॅंक : मासिक बेसिक वेतन 27 लाख रुपये
संदीप बक्षी: आयसीआयसीआय बॅंक: मासिक बेसिक 22 लाख रुपये
रोमेश सोबती: इंडसइंड बॅंक: मासिक बेसिक 16 लाख रुपये

मुंबई : एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी हे देशातील सर्वाधिक वेतन घेणारे बॅंकर आहेत. त्याचबरोबर ते देशातील खासगी क्षेत्रातील बॅंकेच्या प्रमुखपदी सर्वाधिक काळ असलेले बॅंकरसुद्धा आहेत.

मागील दशकभरापासून पुरी हे सर्वाधिक वेतन घेणारे बॅंकर आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्यांचा दरमहिन्याचा फक्त बेसिक पगार 89 लाख रुपये (वार्षिक बेसिक वेतन 10 कोटी 68 लाख रुपये) होता. दुसऱ्या क्रमांकावर अॅक्सिस बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी आहेत. जानेवारी महिन्यात चौधरी यांनी शिखा शर्मा यांच्याकडून अॅक्सिस बॅंकेचा पदभार स्वीकारला होता. चौधरी यांचे वार्षिक बेसिक वेतन 3.60 कोटी रुपये होते. चौधरी यांचे मासिक बेसिक वेतन 30 लाख रुपये होते.

तिसऱ्या क्रमांकावर कोटक महिंद्रा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक आहेत. कोटक यांचे मासिक बेसिक वेतन 27 लाख रुपये इतके होते. चौथ्या क्रमांकावर आयसीआयसीआय बॅंकेचे प्रमुख संदीप बक्षी आणि पाचव्या क्रमांकावर इंडसइंड बॅंकेचे रोमेश सोबती आहेत. बक्षी यांच्यापेक्षा आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचा पगार जास्त होता. त्यांना मासिक बेसिक 26 लाख रुपये इतके वेतन होते. तर बक्षी यांना मासिक बेसिक पगार 22 लाख रुपये आहे. तर रोमेश सोबती यांना 16 लाख रुपये मासिक बेसिक पगार मिळतो. 

आदित्य पुरी: एचडीएफसी बॅंक:  वार्षिक वेतन 10 कोटी 68 लाख रुपये 
अमिताभ चौधरी: अॅक्सिस बॅंक : वार्षिक वेतन  3.60 कोटी रुपये 
उदय कोटक:  कोटक महिंद्रा बॅंक : मासिक बेसिक वेतन 27 लाख रुपये
संदीप बक्षी: आयसीआयसीआय बॅंक: मासिक बेसिक 22 लाख रुपये
रोमेश सोबती: इंडसइंड बॅंक: मासिक बेसिक 16 लाख रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 high salaried bankers from popular banks