esakal | काश्मीरमध्ये 'जैश'च्या दहशतवाद्यांची घुसखोरी; अलर्ट घोषित
sakal

बोलून बातमी शोधा

kashmir

बकरी ईद आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त देशात मोठ्या घातपाताची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने (आयबी) दिला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट महत्त्वाचा समजला जात आहे.

काश्मीरमध्ये 'जैश'च्या दहशतवाद्यांची घुसखोरी; अलर्ट घोषित

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली असून, जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून काश्मीर खोऱ्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बकरी ईद आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त देशात मोठ्या घातपाताची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने (आयबी) दिला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट महत्त्वाचा समजला जात आहे. जैशे मोहंमदचे पाच दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसले असून बकरी ईद आणि स्वतंत्र्य दिनाला मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा इशारा देण्यात आला आहे. 

जम्मू-काश्मीरसह देशातील इतर भागातही दहशतवादी हल्ले होऊ शकतात असे आयबीने राज्य पोलिसांना सांगितले आहे. इसिस किंवा आयएसआयचा पाठिंबा असलेले दहशतवादी गर्दीच्या ठिकाणावर हल्ला करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. पाकव्याप्त काश्मीरमधून या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

loading image