'मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटींचा बँक फ्रॉड'

Narendra Modi
Narendra Modiesakal

नवी दिल्ली : "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झाली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी लूट झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी (Narendra Modi) मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत," अशी तीव्र टीका राहुल गांधी यांनी आज ट्विटद्वारे केली. (Rahul Gandhi)

Narendra Modi
खूशखबर! रेल्वेत उद्यापासून पुन्हा सुरु होणार खानपान सेवा

भारतीय स्टेट बँकेच्या (State Bank of India) नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची कथितरीत्या २२ हजार ८४२ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एबीजी शिपयार्ड लि. (ABG Shipyard) आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. काल दिवसभर या कंपन्यांच्या कार्यालयांवर ‘सीबीआय’कडून छापे घालण्यात आले. हा आत्तापर्यंत उघड झालेल्या सर्वांत मोठ्या गैरव्यवहारांपैकी एक मानला जात आहे. या प्रकरणावरून मोदी सरकारवर काँग्रेसकडून टीका केली जात आहे. राहुल गांधी यांनीही ट्विट करून गेल्या ७५ वर्षांतील सर्वांत मोठा गैरव्यवहार असल्याचे म्हटले आहे. (ABG Shipyard)

Narendra Modi
Punjab: २५ टक्के उमेदवार गुन्हेगारीने कलंकित; बहुतांश संपत्तीने गडगंज

काय आहे एबीजी शिपयार्ड?

एबीजी शिपयार्ड (ABG Shipyard) ही कंपनी मोठी जहाजे बनविणे आणि ती दुरुस्त करण्याच्या व्यवसायात आहे. या कंपनीचे मुख्यालय गुजरातच्या दहेज आणि सुरतमध्ये असल्याची माहिती ‘सीबीआय’ने दिली आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेड (ABG Shipyard) या कंपनीचे मुख्य संचालक रिशी अग्रवाल आहेत. सुरतमधील कंपनीच्या शिपयार्डमध्ये तब्बल १८ हजार डेड वेट टनेज क्षमतेची जहाजे बांधण्याची क्षमता आहे. तर दुसरीकडे दहेजमधील शिपयार्डमध्ये एक लाख २० हजार डेड वेट टनेजची जहाजे बांधण्याची क्षमता आहे.

कसा झाला गैरव्यवहार?

गैरव्यवहारासंदर्भात सर्वांत आधी स्टेट बँकेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या ‘फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट’नुसार, एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ या कालावधीमध्ये आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून बँकेने दिलेल्या कारणाव्यतिरिक्त निधी दुसरीकडे वळविल्याचे स्पष्ट झाले आहे. (ABG Shipyard)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com