माकडांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू, एकुलत्या लेकीसाठी आई-वडिलांचा हंबरडा

5 Year Old Girl Died in Money Attack
5 Year Old Girl Died in Money Attackesakal
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशातील बरेली (Barailly Uttar Pradesh) जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत खेळत असलेल्या ५ वर्षाच्या चिमुकलीवर माकडांनी हल्ला केला. तिच्या शरीराला चावा घेतला. रक्तस्त्राव झाल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला.

5 Year Old Girl Died in Money Attack
आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; साल्हेर किल्ला परिसरात आढळला मृतदेह

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील बिथरी चैनपूरच्या बिचपुरी गावाजवळ घडली. इथं नंदकिशोर हे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. ते मोलजमुरी करतात. त्यांची पत्नी देखील मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकण्यास मदत करते. नंदकिशोर आणि त्यांची पत्नी कामावर गेले होते. त्यांची पाच वर्षांची मुलगी नर्मदा आपल्या मित्रांसोबत खेळत होती. दरम्यान, माकडांनी तिच्यावर हल्ला केला. अशा स्थितीत तिच्यासोबत खेळणारी मुले मदतीसाठी गावात धावली. पण तोपर्यंत नर्मदेला माकडांनी पकडले होते. यादरम्यान लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी नदीकाठावर धाव घेत माकडांना हाकलले. पण, माकडांनी मुलीच्या शरीरावर जखमा केल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी तिला रुग्णालयात दाखव केले. पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नर्मदा ही दोन भावंडामध्ये एकुलती एक मुलगी होती. मात्र, माकडांना ती देखील हिरावून घेतली, असं म्हणत तिच्या वडिलांनी हंबरडा फोडला. नर्मदाचे आई-वडील आपली एकुलती एक मुलगी गमावल्याने बेशुद्ध झाले होते. एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही माकडांपासून सुटका करण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com