
दिल्ली एनसीआरमध्ये काउंटी ग्रुप आणि त्यांच्याशी संबंधित इतर कंपन्यांच्या ठिकाणांवर शनिवारी चौथ्या दिवशीही आयकर विभागाने छापेमारे केली. जवळपास ५० कोटींपेक्षा अधिक जप्ती झाली असून यात रोकड, सोने-चांदी यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅट विक्रीत ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोख घेतल्याचे पुरावे आढळून आले आहेत.