Uttarakhand Avalanche : उत्तराखंड हिमस्खलन; बर्फात अडकलेल्या चार कामगारांचा मृत्यू
Rescue Operation : उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातल्या माना गावाजवळ झालेल्या हिमस्खलनात ५० कामगार अडकले होते. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला असून आणखी ५ जणांचा शोध सुरू आहे.
डेहराडून (पीटीआय) : उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात माना गावाजवळ शुक्रवारी झालेल्या हिमस्खलनानंतर बर्फाखाली अडकलेल्या ५० कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून आणखी पाच जणांचा शोध सुरू आहे.